Ad will apear here
Next
वारजे येथे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘पुस्तक घ्यावे पुस्तक द्यावे’ उपक्रम
पुणे : ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजनेतील एक अनोखा उपक्रम पाच आणि सहा ऑगस्ट रोजी वारजे येथे आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत वाचकांनी त्यांना आवडलेले पुस्तक मोफत घेऊन जायचे आहे आणि त्या बदल्यात आपल्याकडील एक पुस्तक द्यायचे आहे. नाशिकचे कुसुमाग्रज प्रतिष्ठान व वारजे येथील आदित्य गार्डन सिटी सोसायटीने संयुक्तपणे हा उपक्रम हाती घेतला आहे.

या निमित्ताने सोसायटीच्या सभागृहात रविवारी सायंकाळी चार वाजता ‘गप्पा टप्पा’ हा ‘मनकल्लोळ’कार नीलांबरी जोशी यांचा कार्यक्रम होणार असून, त्याला ज्येष्ठ कलावंत धनंजय देशपांडे उपस्थित राहणार आहेत. 

‘या कार्यक्रमाचा आणि ‘पुस्तक घ्यावे! पुस्तक द्यावे!!’ योजनेचा पुणेकर वाचनप्रिय रसिकांनी अवश्य लाभ घ्यावा,’ असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 
या योजनेत शैक्षणिक पुस्तके, मासिके घेतली जाणार नाहीत, असे आयोजकांनी कळविले आहे.

संपर्क : 
श्यामराव पाठक : ८४०८८ १६६००     
विरजा दिवेकर : ९८५०५ ९६६६९ 

कार्यक्रमाविषयी :
दिवस : शनिवार, पाच ऑगस्ट २०१७ 
वेळ : सायंकाळी पाच ते रात्री आठ 
रविवार,  सहा ऑगस्ट २०१७ 
वेळ : सकाळी दहा ते सायंकाळी सहा
गप्पा टप्पा कार्यक्रम 
रविवारी सायंकाळी चार वाजता
स्थळ : आदित्य गार्डन सिटी , आरएमडी सिंहगड कॉलेजजवळ, वारजे, पुणे

संपर्क : विनायक रानडे, कुसुमाग्रज प्रतिष्ठान
मोबाइल : ९९२२२ २५७७७ 
व्हॉट्सअॅप : ९४२३९ ७२३९४
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZZHBF
Similar Posts
पुस्तक द्यावे, पुस्तक घ्यावे उपक्रम नाशिकमध्ये नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ग्रंथ तुमच्या दारी योजनेतील ‘पुस्तक घ्यावे, पुस्तक द्यावे!’ या अनोख्या उपक्रमाला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत १५ ठिकाणी झालेल्या या उपक्रमात दहा हजार वाचक सहभागी झाले आणि वीस हजार पुस्तकांचे आदानप्रदान झाले. सुरुवातीला अनेकांनी धार्मिक
‘पुस्तक घ्यावे! पुस्तक द्यावे!!’ उपक्रम अहमदनगरमध्ये अहमदनगर : ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजनेतील एक अनोखा उपक्रम   ‘पुस्तक घ्यावे! पुस्तक द्यावे!!’ आठ सप्टेंबर रोजी अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानसह रोटरी क्लब ऑफ अहमदनगर , प्रियदर्शिनी यांनी संयुक्तपणे हा उपक्रम आयोजित केला आहे.  या उपक्रमात वाचकांना   त्यांना आवडलेले
पुस्तक रथ जाणार भिलारला भिलार (पुणे) : कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे तीन मे रोजी सकाळी अकरा वाजता पुण्यातील ‘माझं ग्रंथालय’ येथे नव्या ग्रंथपेटीचे वितरण करण्यात आले. चार मे रोजी राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या पाचगणीजवळच्या भिलार या मराठी पुस्तकांच्या गावाचा शुभारंभ होत आहे. तेथे ‘ग्रंथ तुमच्या दारी’च्या ‘पुस्तक रथा’चे आगमन होणार आहे
वाकड येथे ‘ग्रंथ तुमच्या दारी’ पुणे : कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे वाकड येथे गुरुवारी, १३ जुलै रोजी ग्रंथपेट्यांचे वितरण करण्यात येणार आहे. प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख व ख्यातनाम पत्रकार, तसेच ‘गुलाबराव पारनेरकर’ या विनोदी पुस्तकाचे लेखक सचिन जगदाळे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असेल. या पुस्तक वितरण कार्यक्रमात कुसुमाग्रज

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language